नागपूर – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. हा कायदा राज्यात लवकरात लवकर अंमलात आणावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपकडून केली जात आहे. परंतु या कायद्याला महाविकास आघाडी सरकारनं विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर या कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पहावयास मिळाले. नागरिकत्व सुधारणा कायदा हा माझ्या जातीविरोधात आहे. माझी जात वंजारी आहे, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत म्हटलं आहे.
दरम्यान माझ्या जातीतील 50 टक्के लोकसंख्या ही शेतमजुरी करायला जाते. शेतमजुरी करत असताना त्यांची बाळंतपणे सुद्धा त्या शेतात होतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकाराचे प्रमाणपत्र नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी यांनी म्हटले आहे. तसेच घिसाडी, पारधी, मसणजोगी, नंदिवाले, दरवेशी, कैकाडी, कुडमुडे जोशी, वैदू, तमटकरी, अस्वलवाले या भटक्या जातीच्या लोकांची आज कोणत्याच ग्रामपंचायती किंवा नगर परिषदेच्याहद्दीत अजूनही नोंदी नाही.
रेणके आयोगाने सांगितले आहे की जवळपास 90 ते 95% भटक्या लोकांकडे रहिवाशी प्रमाणपत्र नाही मग त्यांना रेशनकार्ड कसं मिळेल. स्वतःची जमीन नाही, रेशनकार्ड नाही मग यांनी नागरिक आहे म्हणून कसं सिध्द करायचं असंही आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS