मुंबई- प्लास्टिक बंदीवर ठोस पाऊल उचलत सरकारने आजपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून प्लास्टिक वापरणाऱ्या व्यक्तीकडून 5हजार रुपये दंड आकारले जात आहेत. आज अनेक शहरात प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून दंड आकारला गेला असून दंड भरलेल्या पावत्या सध्या सोशलमीडिया वर व्हायरल होत आहेत. त्यातच प्लास्टिक बंदीची राबवली जाणारी पद्धत ही चुकीची आहे असं आक्षेप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे.
प्लास्टिक बंदीच्या स्वागत करीत असताना या हुकूमशाही पद्धतीचा निषेध ही करायला हवा. कसल दंड लावता 5हजार रुपये 10 हजार रुपये 3महिने जेल पण यापूर्वी प्लास्टिकच्या बाबतीत लोकजागरण कोण करणार असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
एरव्ही छोटासा खड्डा पडला तरी मोदींसाहेब अमिताभ बच्चन यांचा वापर करून जाहिरात करतात, लोकशिक्षणाचा भाग दाखवतात, आत्ता पर्यंत इतिहासात जेव्हढा खर्च जाहिरातीवर झाला नाही तेव्हढा खर्च केंद्र आणि राज्य सरकारने केला आहे. मग प्लास्टिकच्या बाबतीत लोकशिक्षण आणि जनजागरण करायला नको?
5 हजार , 10 हजार दंड आकारता हे काय हुकूमशाही आहे का? पर्याय काय ते तरी सांगितलंय? त्याचा विचार करायला लोकांना अवधी न देता लोकांमध्ये घबराट आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच आव्हाड म्हणाले. आम्ही प्लास्टिकच्या बाजूने नाही आहोत परन्तु त्याला राबवण्याची जी पद्धत अवलंबली आहे त्याच्या आम्ही विरोधात आहोत असेही आव्हाड यांनी सांगितले.
COMMENTS