ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली असून संतांचा अवमान केल्या प्रकरणी त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने होत आहे. भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीने निलंबनाची मागणी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ प्रसारित केला होता, त्यात त्यांनी संतांचा अवमान केला आहे, असा आरोप भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने केला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतीक आणि आध्यात्मिक अस्मिता लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांचे त्वरीत निलंबन करावं तसंच त्यांना जाहीर माफी मागण्याचे आदेश द्यावेत, असंही पत्रात लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडे गुरुजींच्या संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ या वक्तव्याला उत्तर देताना फेसबुकलाईव्ह केला होता, त्यात त्यांनी भिडे गुरुजी आणि राज्यसरकार वर टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता अस वक्तव्य केल होत. त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर टीका ही झाली होती. व आता भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने त्यांच्या निलंबनाची मागणी होत आहे.
काय म्हणलय पत्रात पहा-
COMMENTS