गद्दाराला माफी नाही, जेम्स लेन प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांचा दिलीप येळगावकरांवर हल्लाबोल !

गद्दाराला माफी नाही, जेम्स लेन प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांचा दिलीप येळगावकरांवर हल्लाबोल !

मुंबई – जेम्स लेन प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप येळगावकरांवर हल्लाबोल केला आहे. गद्दाराला माफी नाही असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. याबाबतचा व्हिडीओ आव्हाड यांनी ट्वीट केला असून जोरदार टीका त्यांनी वेळगावकरांवर केली आहे. पाहूयात काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड…

काल येळगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत विक्रुत प्रकारचे लिखाण करणारं जेम्स लेन प्रकरण किरकोळ वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीत होत असलेला अपमान सहन न करता उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश करावा असं आवाहन भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केलं आहे. हे करत असताना त्यांनी उदयनराजे यांनी भाजप का सोडला होता याचं कारण दिलं. उदयनराजे यांची राजकीय कारकिर्द भाजपात बहरली होती. मात्र जेम्स लेन सारख्या किरकोळ मुद्यावरुन त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता असंही येळगावकर यांनी म्हटलं होतं. पहा काय म्हणाले दिलीप येळगावकर….

दरम्यान जेम्स लेन प्रकरणावरुन 2009 मध्ये रान पेटलं होतं. त्यावेळी आर आर पाटील यांनी यावरुन राज्यभरात भाजपवर हल्लाबोल केला होता. आताही या प्रकरणी शिवप्रेमींमध्ये येळगावकरांविषयी संताप निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा या प्रकरणानं तोंड वर काढलं असून यामुळे मोठा वाद होण्याची चिन्ह दिसत आहे. येळगावकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS