मुंबई – अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी गांधीजींसमोर नतमस्तक होतात, तर हेगडे गांधीजींची चेष्टा करतात, आरएसएसच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात गांधीजींबाबत किती द्वेष आहे हे ह्यातून स्पष्ट होतं. पंतप्रधान यांनी भारताची नाही तर जगाची माफी मागितली पाहिजे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. हिंमत असेल तर मोदींनी निर्णय घेऊन साध्वी, हेगडे यांना बाहेर काढावे. असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
स्नुपिंग,फोन टॅपिंग
स्नुपिंग कुणाचं केलं ते महत्त्वाचं नाही,कायद्यानुसार स्नुपिंग करू शकत नाही. इस्राईलला ट्रेनिंगला कोण गेलं, कोणी आदेश दिला हे पाहिलं पाहिजे असंही आव्हाड यांनी स्नुपिंग,फोन टॅपिंगबाबत म्हटलं आहे.
दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. माणसाने घसरावे तर किती घसरावे. हे राज्य माझ्या बापाचे,उद्धव ठाकरे यांच्या बापाचे आहे. ही माती आमची म्हणून आमच्या बापाचे राज्य, आमचे बाप इथल्याच मातीतील, आम्ही गुजरातमध्ये जात नाही. मराठी माणूस बाप आहे,त्यांनीच ठरवलं. मला वाईट वाटत नाही ते काय बोलेले असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS