म्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभी करणार – जितेंद्र आव्हाड

म्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभी करणार – जितेंद्र आव्हाड

मुंबई – म्हाडा टागोर नगर, कन्नमवार नगरसारख्या मोठ्या वसाहती उभ्या करणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. कतसेच याबाबत मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी चर्चा करणार असून उपनगरात काही जमीनी उपलब्ध आहेत त्या ताब्यात घेता येतील असंही ते म्हणाले आहेत.

तसेच उपनगरातील काही कंपन्यांच्या जमीनी वादात आहेत त्या घेता येतील आणि परवडणारी घरं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देता येतील. म्हाडाने ३० ते ४० वर्षांपूर्वी कन्नमवार नगरसारख्या मुंबईत ५६ म्हाडाच्या वसाहती उभ्या केल्या आहेत. ठाण्यात कंपन्यांची शेकडो एकर जमिनी न्यायालयीन वादात अडकली आहे, त्या जमीनी ताब्यात घेऊन स्वस्त घरं उभी करणार असल्याचंही आव्हाड म्हणाले आहेत.

COMMENTS