शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत – जितेंद्र आव्हाड

शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत – जितेंद्र आव्हाड

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच ते पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु शरद पवार हे महाराष्ट्रातून कोणतीही लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. याबाबत आव्हाड यांनी ट्वीट केलं असून शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच कुणी कुणाला सांगितले माहीत नाही की शरद पवार साहेब हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत पण हे महाराष्ट्रातील कुठल्या ही लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणार नाहीत असंही ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान शरद पवार हे त्यांच्या पारंपारिक बारामती मतदारसंघाऐवजी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती होण्याची शक्यता आहे. तशा परिस्थितीमध्ये पवार महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात होतं.

परंत 2014 नंतर लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा पवार यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी मागची निवडणूक लढवली नव्हती. ते राज्यसभेत गेले होते. मात्र संभाव्य राजकीय स्थिती लक्षात घेता 2019 मध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. तसचं भाजपच्या सुमारे 100 जागा कमी होण्याची शक्यता असल्यामुळेही ते निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं.

परंतु आगामी लोकसभा निवडणूक ते लढवणार नसल्याचं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

 

COMMENTS