म्हणून मला शरद पवारांचा तो दुर्गुणही भावतो – जितेंद्र आव्हाड

म्हणून मला शरद पवारांचा तो दुर्गुणही भावतो – जितेंद्र आव्हाड

पुणे – कधी काही चुकलं तर पवारसाहेब वडिलांसारखं प्रेमानं सगळ्या गोष्टी समजावतात. प्रसंगी रागवतातही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. शरद पवार हे कधीही कोणावर कमरेखालचे वार करत नाहीत. तो त्यांचा दुर्गुण आहे. पण तो उपजत त्यांचा गुण आहे असं मला वाटतं. कारण राजकारणासाठी किती खालच्या पातळीला जायचं यालाही काही मर्यादा असतात. म्हणून मला त्यांचा तो दुर्गुणही भावतो, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ‘बीबीसी मराठी’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान मी पवार साहेबांच्या विचारधारेवर प्रेम करतो. मला जटायू व्हायचंय. हनुमान नाही. आणि माझी छाती फाडून मला शरद पवार साहेब माझ्या हृदयात आहेत, असं दाखवायचं नाही. जे सोडून गेले ते गेले. त्यांना जाऊ द्या. आता त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण इतिहासात आयत्यावेळी मला कुणी पवार साहेबांची साथ सोडली, असं म्हणणार नाही, असंही आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS