शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड झाले भावूक!

शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड झाले भावूक!

शहापूर – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदिवसी पाड्यांवर भेट देऊन एका झोपडीत जेवत असल्याचे फोटो शेअर केले आहेत.
‘या नेत्याला काय म्हणावे, कुडाची झोपडी…आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक, तांदळाची भाकरी, भाजलेला कोंबड्याचा रस्सा आणि कनटोरल्याची भाजी आणि साहेब जेवत आहेत. संस्मरणीय दिवस.’ असं लिहून जितेंद्र आव्हाड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी शहापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी कर्करोग असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचं भूमीपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. भूमीपूजनानंतर पवारांनी आदिवासी पाड्याला भेट दिली. यावेळी दुपारच्या जेवणाचा आस्वाद त्यांनी पाड्यावर रामचंद्र खोडके यांच्या घरी घेतला. अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवार आदिवसी पाड्यांना विशेष भेट देतात. तिथल्या लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि असलेल्या सुविधांचा अभाव याचा आढावा ते वेळोवेळी घेत असतात. शहापूर इथे ग्रामीण भागात कर्करोगाची वाढती संख्या, मुलांचं आरोग्य यासगळ्याचा विचार करता नव्यानं उभारण्यात य़ेणारं रुग्णालय आदिवासी पाडे आणि ग्रामस्थांना वरदान ठरेल अशी आशा यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS