मुंबई -मला तर वाटत होतं. अजितदादा आज भेटणारच नाहीत. वाटलं होतं, निघून जातील कुठं तरी हिमालयात आणि येणारच नाहीत. म्हणतील जाऊ द्या 3 महिन्यांनी जातो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. तसेच अजित पवार हा अतिशय टोकाचा माणूस आहे. तो फक्त घाबरत असेल, ऐकत असेल तर फक्त पवार साहेबांचं, अजित दादा खूप भावनिक आहेत असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एवढे बेछूट आरोप झेलण्यापेक्षा खड्ड्यात गेलं राजकारण… एकटा जगतो मी, ही भावना अजित दादांमध्ये होती. आणि आज ती भावना त्यांनी तमाम महाराष्ट्रासमोर मांडली. माणूस असा उद्वीग्न होत नाही. अजित दादांनी किती हमले सहन करायचे? मुख्यमंत्रीपदाचा माणूस म्हणून अजित दादांकडे पाहिलं जातं म्हणून त्यांच्यावर बेछूट आरोप करायचे? असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
तसेच अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.गेली 5 वर्ष सातत्याने भाजप सरकारने अजित पवारांना बदनाम केले. भाजपच्या मनात राग होताच. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर महाराष्ट्राच्या एक वर्ग हा अजित दादांना टार्गेट करत होता. त्यांचा मोकळा स्वभाव त्यांचा करडा आवाज हे महाराष्ट्राला दिसतं. पण त्यांचा कुटुंब वत्सल स्वभाग, भावना प्रधान, हृदयामध्ये अतिशय मृदू असलेला अजित पवार कोणालाही माहित नाही, असेही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS