‘आयोध्येत राममंदिर का?’ या विषयावरील जेएनयूमधील व्याख्यान रद्द

‘आयोध्येत राममंदिर का?’ या विषयावरील जेएनयूमधील व्याख्यान रद्द

दिल्ली – देशभरात सध्या राममंदिराचा मद्दा गाजत आहे. ‘आयोध्येत राममंदिर का?’ या विषयावर असणारे जेएनयूमधील भाषण रद्द करण्यात आले आहे. या विषयावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु त्यांचं हे व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय जेनयूच्या प्रशासनानं घेतला आहे. त्यांचं व्याख्यान रद्द केल्यामुळे सध्या विविध विषयांवर तर्कवितर्क लावले जात आहेत.

सुब्रमण्यम स्वामी हे राममंदिराच्या बाजूने कट्टर समर्थक आहेत. तसेच ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आयोध्येत राममंदिरच का असावे अशा आशयावर त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन जेएनयूमधील कोयना वसतिगृहात करण्यात आलं होतं. परंतु जेनयू प्रशासनानं त्यांच्या व्याख्यानास विरोध करत जेनयूच्या आवारात हे व्याख्यान घेण्यास नकार देण्यात आला आहे.

आज बुधवारी त्यांच्या या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. याबाबत जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्याख्यानाची तयारी देखील केली होती. परंतु त्यांचं हे व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय जेएनयू प्रशासनाने घेतल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS