सांगली – सैन्याचा अपमान करणारे मोहन भागवत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. तसेच मोहन भागवत यांच्या वक्तव्यानुसार, जर त्यांना लढाईच करायची इच्छा असेल तर, जशी सैन्यात महार आणि मराठा रेजमेंट आहे तशी ब्राह्मण रेजमेंट तयार करण्याची मागणीही जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. सांगलीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारही टीका केली आहे.
वर्ण आणि जातीचा अंधार पुन्हा देशात पसरवण्याचा प्रयत्न सूरु केला असून कोरेगाव भीमा येथील ती दंगल नव्हती तर तो हल्ला होता असंही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे. या देशाची संस्कृती बकवास आहे कारण अजूनही संस्कृतीच्या नावाखाली वर्ण भेद पसरवला जात आहे. देशद्रोही लोक हे राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहेत. तसेच ज्यांना हाफ पँटची फुल पँट करायला 70 वर्ष लागले, ते काय भारतीय राज्यघटना बद्दलणार अशी टीकाही कवाडे यांनी केली आहे.
COMMENTS