चेन्नई – एका महिला पत्रकाराने राज्यपालांना प्रश्न विचारला या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी राज्यपालांनी तिच्या गालाला हात लावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असल्याचं दिसत आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी हे कृत्य केलं असून त्यांच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार कनिमोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून राज्यपालांनी आपल्या मर्यादा समजायल्या हव्यात. त्यांनी महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला आहे. त्यांनी तिचा सन्मान राखलेला नसल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान सेक्स फॉर डिग्री प्रकरण सध्या गाजत असताना हा प्रकरार घडल्यामुळे निषेध केला जात आहे. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी ‘संबंध’ ठेवावे लागतील, अशी ‘ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिकेने चार विद्यार्थिनींना दिली होती. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्याने तामिळनाडूत वातावरण तापलं असून त्यातच पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे.
COMMENTS