भाजपाचं पक्षाध्यक्षपद अमित शाहांकडे कायम, कार्यकारी अध्यक्षपदी जे. पी. नड्डा !

भाजपाचं पक्षाध्यक्षपद अमित शाहांकडे कायम, कार्यकारी अध्यक्षपदी जे. पी. नड्डा !

मुंबई – अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते पक्षाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा होती. परंतु शाह यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

दरम्यान गृहमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी, असे शाह यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने जे.पी. नड्डा यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी केली आहे. जे पी नड्डा रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक असून ते भाजपाचे ज्यष्ठ नेते आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं मिळवलेल्या अभूतपुर्व यशात नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना मिळालेल्या प्रचंड विजयामागे जे. पी. नड्डा यांचीही महत्त्वाची भूमिका होती.

COMMENTS