जस्टीस लोयांच्या मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे जाहीर करु नका, महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती !

जस्टीस लोयांच्या मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे जाहीर करु नका, महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती !

दिल्ली – जस्टीस लोया यांच्या मृत्यू प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आज महाराष्ट्र सरकारने या प्रकरणातील कागदपत्रे कोर्टाला सादर केली. ही गोपनीय कागदपत्रे आहेत. हा अहवाल जाहीर करु नये अशी विनंती राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला केली आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. हरीश साळवे यांनी महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणी बाजू मांडली. दरम्यान या प्रकरणी दोन याचिकांवरील सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली आहे. मात्र पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

जस्टीस लोया यांचे मृत्यू प्रकरण गंभीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसंच महाराष्ट्र सरकारला या संदर्भात कागदपत्रे सादर कण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज महाराष्ट्र सरकारतर्फे या प्रकरणातील कागदपत्रे कोर्टाला सादर करण्यात आला.

जस्टील लोया हे अमित शहा आरोपी असलेल्या सोहराबुद्दीलन खटल्यातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांच्या मृत्यूबाबत विविध शंकाकुशंका घेतल्या जात होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र परवा जस्टीस लोया यांच्या मुलाने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आपल्याला काहीही घातपात वाटत नसल्याचं वक्तव्य केलं होतं.

COMMENTS