जस्टीस लोया मृत्यू प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !

जस्टीस लोया मृत्यू प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !

नवी दिल्ली –  जस्टीस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारला सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्त्यांनी लोया यांच्या मृत्यूप्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांबाबत सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान लता मंगेशकर रुग्णालय सर्वात चांगले असून लोया यांना त्याठिकाणी भरती का केले नाही?, कागदपत्रांवर ओवर रायटिंग केली आहे, तसेच  नवीन दस्ताऐवज मागवण्यात यावे याबाबत याचिकेत मागणी करण्यात आली आहे. आमचं या प्रकरणावर विशेष लक्ष असणार असून या सुनावनीत या घटनेशी संबंधित सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

COMMENTS