नवी दिल्ली – देशात ‘कोरोना’चा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तसेच ज्योतिरादित्य यांच्या मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही संसर्ग झाला आहे. दोघांवरही राजधानी दिल्लीतील साकेत मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यानंतर आता संपूर्ण शिंदे कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे थेट भोपाळहून दिल्लीला आले होते. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते दिल्लीतच आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण कुठे झाली याबाबतचा अधिक तपास आरोग्य कर्मचारी करत आहेत.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोविड चाचणी घेतली जाणार आहे. ताप आणि घसा खवखवत असल्यामुळे त्यांची
आज संध्याकाळी टेस्ट घेण्यात येणार आहे. कोरोनाची लक्षण दिसत असल्यामुळे आम आदमी पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.
COMMENTS