भोपाळ – काँग्रसचे युवा नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपच आमदाराच्या मुलाने ही धमी दिली आहे. सोशल मीडियावर अशी धमकीची पोस्ट टाकली आहे. मध्य प्रदेशाच्या दमोह जिल्ह्यातील हटा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार उमादेवी खाटीक यांच्या मुलाने ही धमकी दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचा एकेरी उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे. ज्या जीवाजीराव यांनी बुंदलखंडची मुलगी झाशीची राणी हिचा खून केला त्याचं रक्त तुझ्यात आहे. तु आमच्या जिल्ह्या येऊन उपकाशीला अपवित्र करु नको अशा शब्दात त्यांनी ही धमकी दिली आहे.
आमदार उमादेवी खाटीक यांनीही मुलाने टाकलेल्या फेसबूक पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे हे पुढच्या आठवड्यात दमोह जिल्ह्याच्या दौ-यावर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धमकी देणा-या भाजपच्या आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. या धमकीतून भाजपचं खरं रुप बाहेर आलं असल्याची टीका ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. तसंच आपण असल्या धमक्यांना भिक घालत नसल्याचंही म्हटलं आहे.
The real face of BJP comes forward with this. The aim of BJP govt, its leadership and CM Chouhan is only to demolish Congress. I would like to tell them that we will never bow down to such threats: Jyotiraditya Scindia on MP BJP MLA's son allegedly threatening to shoot Scindia. pic.twitter.com/W5i3rIFAXq
— ANI (@ANI) September 3, 2018
COMMENTS