भाजपचे डॅमेज कंट्रोल

भाजपचे डॅमेज कंट्रोल

पुणे – पुणे महानगरपालिकेतील काही भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी माजी खासदार संजय काकडे यांच्या तीन समर्थक नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये स्थान दिले आहे.

संजय काकडे हे भाजपच्या पाठिंब्याने 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. अपक्ष म्हणून ते खासदारपदी निवडून आले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपली. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.

काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी राज्यात आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न येऊ शकतो, असे भाकीत वर्तविले होते. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि निवडणुकीच्या मॅनेजमेंटसाठी संजय काकडे राजकीय वर्तुळात ओळखले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असल्याचीही चर्चा आहे. आता काकडे समर्थक नगरसेवकांना स्थायीत स्थान देत भाजपनेही काहीसे डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसत आहे.

COMMENTS