सोलापूर – महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार संपर्कात असल्याचा वारंवार उल्लेख केला. दरम्यान, त्या दोघांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे प्रत्यय आज शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आला. या दौऱ्यात भाजपचे आमदार कल्याण काळे पवारांसोबत होते. तसेच कार्यक्रमात पवारांकडूनही काळेंचा वारंवार उल्लेख केल्याने सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्के देण्यात सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये (सोलापूर, माढा) प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांची ओळख आहे. शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत.
कल्याण काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ असून भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष, सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांचा राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात भाजपचे पारडे जड होणार आहे.
शुक्रवारी शरद पवार आणि कल्याण काळे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणात शरद पवार यांनी काळे यांचा वारंवार उल्लेख केला. तसेच काळे यांनी आगामी काळात पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कल्याणराव काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.
सप्टेंबर महिन्यात शरद पवार सोलापूर आले होते. तेव्हा शासकीय विश्रामगृहात बराच वेळ काळे पवारांची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, काळेंनी हेलीपॅडवर जाऊन पवारांशी चर्चा केली होती. तेव्हापासून ते भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगत होती.
COMMENTS