चेन्नई – अभिनेता कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींना खुलं पत्र लिहिलं आहे. कावेरी नदीच्या पाण्याच्या मुद्द्यावर तामिळनाडूला न्याय द्या, अशी विनंती अभिनेते कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ट्विटरवरुन कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे तसेच एक खुलं पत्रही कमल हासन यांनी लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी कावेरी जल व्यवस्थापन मंडळ अद्याप स्थापना न झाल्याने तामिळनाडूची जनता हताश झाली असून ती न्याय मागत आहे. तामिळनाडू ज्याची मागणी करत आहे, ते तुम्ही सहजरित्या देऊ शकता. त्यामुळे कृपया आम्हाला मदत करा असं कमल हासन यांनी म्हटलं आहे.
To my Honourable Prime Minister #KamalAppealToPM @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/FXlM7dDO9x
— Kamal Haasan (@ikamalhaasan) April 12, 2018
My Open Letter to The Honourable Prime Minister @PMOIndia @narendramodi #KamalAppealToPM pic.twitter.com/P3Vlvzdcqq
— Kamal Haasan (@ikamalhaasan) April 12, 2018
दरम्यान याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन घटनात्मक जबाबदारी पूर्ण केली आहे. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन तुम्ही तुमचं घटनात्मक कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे असंही हासन यांनी म्हटलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुम्ही निर्मदा नियंत्रण प्राधीकरणाची स्थापना करुन नर्मदेच्या पाण्याचं चार राज्यांमध्ये वाटप केलं होतं. आता पंतप्रधान म्हणून कृपया आमची मदत करा आणि कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची स्थापना करुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावे अशी विनंती हासन यांनी केली आहे.
COMMENTS