गौरी लंकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच – कन्हैय्या कुमार

गौरी लंकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच – कन्हैय्या कुमार

मुंबई – गौरी लंकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच असल्याचा जोरदार आरोप कन्हैय्या कुमार यांनी केला आहे. तसेच गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींकडून दाभोलकरांच्या आरोपींची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांनी आरोपींना अटक करण्याआधी घाईगडबडीत महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही कारवाई पाच वर्षांपूर्वी का झाली नाही असा सवाल कन्हैय्या कुमारने केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत असून सेन्सॉरशिप आधीही होती पण आता वाढली आहे. रावणाची दहा तोंडे होती. भाजपाचेही तसेच आहे. मोदी बोलतात एक आणि त्यांचे नेते दुसरीचभूमिका मांडतात असे कन्हैय्या कुमारनं म्हटलं आहे.  मी द्वेष निर्माण करत नाहीये. पण आता देशात द्वेष निर्माण केला जात असून याला विरोध करणाऱ्यांना घाबरवले जात असल्याचंही कन्हैयानं म्हटलं आहे.

 

COMMENTS