जेएनयूमधील वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला युवा नेता आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आगामी 2019 मधील लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तसे संकेत देण्यात आले आहेत. बिहारमधील बेगूसराय किंवा इतर कुठल्यातरी मतदारसंघातून कन्हैया निवडणूकच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती भाकपचे बिहार सरचिटणीस सत्यनारायण सिंह यांनी सांगितलं आहे. याच मतदारसंघात कन्हैयाकुमारचं मूळ गाव आहे. निवडणूक लढवण्याबाबत कन्हैया कुमारसोबत चर्चा झाली असून त्याने निवडणूक लढवण्यास होकार दिल्याची माहितीही सिंह यांनी दिली आहे. जेएनयू प्रकरणात कन्हैया कुमारने मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावर भाजपनंही त्याला तेवढेचे जोरदार उत्तर दिले होते. त्यामुळे पुन्हा 2019 मध्ये ही लढाई पहायला मिळणार आहे.
Newer Post
मुख्यमंत्री
COMMENTS