सिंधुदुर्गात – कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे नारायण राणे हे भाजपच्या मदतीने राज्यसभेवर गेले आहेत. तरीही या निवडणुकीत राणे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच सत्तेत असूनही भाजपवर जोरदार टीका करणा-या शिवसेनेला मात्र भाजपनं पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना -भाजपची युती असून शिवसेना-भाजप विरुद्ध राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशीच लढत पहायला मिळत आहे.
दरम्यान या निवडणुकीत राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार राणे यांचा पक्ष की शिवसेना याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.
COMMENTS