सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीवर अखेर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या लढलेल्या गेलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे समिर नलावडे हे केवळ 37 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे संदेश पारकर यांचा पराभव केला. गेली अनेक वर्ष भाजपचे संदेश पारकर यांचे कणकवलीमध्ये वर्चस्व होते. पारकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नगरपंचायतीमध्येही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकूण 17 जागांपैकी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. संपूर्ण कोकणाचं लक्ष कणकवलीच्या निकालाकडे लागलं होतं. केंद्रात आणि राज्यात एकत्र असलेले भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवलीत मात्र एकमेकांच्या विरोधात लढले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षाला मिळालेला हा पहिलाच मोठा विजय आहे.
COMMENTS