मुंबई – धनंजय मुंडे हे विरोधी पक्षाचा आवाज आहेत ते विधानपरिषदेत नसते तर विरोधी पक्षाचा आवाज म्यूट झाला असता असं वक्तव्य विधानपरिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी केलं आहे. विधानपरिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल शिक्षक आमदार श्री कपिल पाटील यांचा आज धनंजय मुंडे ( विरोधी पक्षनेते ) श्री नाना पटोले ( माजी खासदार ) यांच्या हस्ते गोरेगाव येथे सत्कार फुले पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कपिल पाटील यांनी धनंजय मुंडे हे विरोधी पक्षाचा आवाज असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान कपिल पाटील यांच्याबाबत बोलत असताना आमदार कपिल पाटील हे मृणालताई गोरे यांच्या विचारांचे वारसदार आहेत असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमादरम्यान केलं आहे. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार विरोधी बोलणारा प्रत्येक आवाज दाबला जात आहे, नाना पटोले यांनी सर्वात प्रथम हे धाडस केले. देश आणि राज्यात अप्रत्यक्ष आणीबाणी आली आहे. आजची अराजकता पाहता निर्वाणीच्या लढाईला तयार रहावे लागेल तसेच चारही स्तंभ अडचणीत असून संविधान धोक्यात आले असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. संविधानाला विरोध करणा-यांनी आज मोदींना का ठणकावले नाही. तसेच फक्त संविधान प्रेम दाखवून उपयोग नाही, तर त्याचे संरक्षण करण्याची वेळ आली असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS