नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. करिना कपूर खानला काँग्रेसनं भोपाळमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या काही आमदारांनी केली आहे. भोपाळमधून कोणा राजकारण्याला उमेदवारी न देता करिना कपूर खानला उमेदवारी द्यावी त्यामुळे याठिकाणी आपलाच विजय होईल असं या आमदारांचं म्हणण आहे.
दरम्यान करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून आहे, त्यामुळे जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, असं काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुडडू चौहान आणि अनीस खान यांचं म्हणणं आहे.
तसेच भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आमदारांचा या फॉर्म्युल्यावर राहुल गांधी काय निर्णय घेणार हे प्हण गरजेचं आहे.
COMMENTS