कर्जत – कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत सेना-भाजपा आरपीआय युतीनं बाजी मारली आहे. सेना-भाजपा आरपीआय युतीला 18 पैकी 10 जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 8 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सेना-भाजपा आरपीआय युतीतील शिवसेनेच्या नगराध्यक्षपादाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत सुवर्णा केतन जोशी यांना 9 हजार 977, तर प्रतीक्षा लाड यांना 7 हजार 382 आणि नोटा 2 हजार 104 मतं मिळाली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजपा युती असा सरळ सामना पहायला मिळाला. आमदार सुरेश लाड यांची कन्या रिंगणात असल्याने राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 18 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऍड. प्रतीक्षा लाड आणि शिवसेना – भाजपा युतीच्या सुवर्णा जोशी यांच्यात सरळ लढत पहायला मिळाली. परंतु अवघ्या दोन जागांवरुन राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांना मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS