बंगळुरू – कर्नाटकमध्ये विधानसभेची सूत्रं एका मराठी भाषक नेत्याच्या हातात देण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या दोन आमदारांची नावं चर्चेत असून त्यात मराठी भाषक असलेले राज्याचे माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून देशपांडे यांची ओळख असून ते आठ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. तसेच ७१ वर्षीय देशपांडे हे हलियाल मतदारसंघाचे आमदार असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात ते मध्यम आणि अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. तसेच देशपांडे याच्यासोबत पाचव्यांदा आमदार झालेले के आर रमेश कुमार हेही या शर्यतीत असल्याचं असल्याची माहिती असून या दोघांमध्ये देशपांडे यांनी बाजी मारली, तर कर्नाटक विधानसभेतील सर्वोच्च स्थानी मराठी भाषक विराजमान होणार आहे.
दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ एचडी कुमारस्वामी उद्या घेणार आहेत. तसेच काँग्रेसचा खातेवाटपाचा फॉर्म्युला अजून तयार झाला नसल्यामुळे कुमारस्वामी हे एकटेच शपथ गेणार असल्याची माहिती आहे. तसेच जेडीएस आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. त्यावरून बरीच रस्सीखेच होण्याची चिन्हं आहेत. म्हणूनच, खातेवाटपाआधी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. तर उपमुख्यमंत्रीपदावरुनही सध्या वाद सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री कोणाला करणार याबाबतही सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.
COMMENTS