कर्नाटक – बेल्लारीत भाजपला हादरा 14 वर्षानंतर काँग्रेस विजयी !

कर्नाटक – बेल्लारीत भाजपला हादरा 14 वर्षानंतर काँग्रेस विजयी !

नवी दिल्ली – कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. शनिवारी इथे मतदान झाले होते. बेल्लारी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून याठिकाणी 14 वर्षानंतर काँग्रेसचा विजय झाला आहे. बेल्लारीमध्ये काँग्रेस उमेदवार बीएस उग्रप्पा  यांचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा आहे. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली आहे.

दरम्यान रामनगरच्या विधानसभा जागेवर मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी या वियजी झाल्या आहेत. तर जामखंडी विधानसभा जागेवर काँग्रेसचा उमेदवार आनंद न्यामगौडा यांचा विजय झाला आहे.

तसेच शिमोग्यामधून एडियुरप्पा यांचा मुलगा आघाडीवर असून मंडयामध्ये जेडीएस उमेदवार 1 लाखांनी आघाडीवर. जमखंडीमध्ये काँग्रेस उमेदवार 9 हजार मतांनी आघाडीवर आहे.

 

 

COMMENTS