मुख्यमंत्रीपदाबाबत सिद्धरामय्या यांचं मोठं वक्तव्य !

मुख्यमंत्रीपदाबाबत सिद्धरामय्या यांचं मोठं वक्तव्य !

कर्नाटक – कर्नाटक विधानसभेचं मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचं या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. कर्नाटकमध्ये आता पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता लागली असतानाच सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दलित व्यक्तीसाठी मी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्यास तयार असल्याचं ते म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सिद्धरामय्या यांनी हे वक्तव्य केलं आहे.जर कोणा दलित व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देण्याची गरज पडली तर मी स्वतः मुख्यमंत्रीपदापासून दूर होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सिद्धरामय्या यांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष राहिल हे भाकीत नाकारले असून काँग्रेस स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच एक्झिट पोलबाबत त्यांनी आपलं मत मांडलं असून एक्झिट पोल हे त्या व्यक्तीसारखे आहेत ज्यांना पोहता येत नाही. मात्र, त्याला या गोष्टींचा दिलासा आहे की, तो यात बुडणार नाही. कारण त्याला नदीची खोली केवळ चार फुट सांगून भ्रमित करण्यात आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS