बंगळुरु – कर्नाटकातील काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना भाजपनं ऑफर दिली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार करण्यात आला. यावेळी मंत्रिमंडळात नवीन आठ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दोन मंत्र्याना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. या दोन मंत्र्यांना भाजपनं ऑफर दिली असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नेते रमेश जारकीहोळी आणि अपक्ष आमदार आर. शंकर यांच्या समावेश असून जारकीहोळी यांनी काँग्रेस सोडण्याची धमकी देखील दिली आहे.मुख्यमंत्री के. एचडी. कुमारस्वामी सरकारचा सहा महिन्यातील हा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार आहे.
दरम्यान पालिकाप्रशासन हे कमी महत्त्वाचे खाते दिल्यामुळे रमेश जारकीहोळी नाराज होते. त्यामुळे रमेश जारकीहोळी हे गेले काही दिवस भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच रमेश जारकीहोळी यांची मंत्रिमंडळ पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांचे भाजपा स्वागत करेल, असं वक्तव्य भाजपाचे नेते सदानंद गौडा यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS