कर्नाटक – कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु काँग्रेसच्याच आमदारांनी या पाठिंब्यात विघ्न टाकलं असल्याचं दिसून येत आहे. जेडीएसच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनवण्यास काँग्रेसच्या लिंगायत समाजाच्या आमदारांनी बंड केलं आहे. कुमारस्वामी हे वोकलिग्गा समाजाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवू नका असं या आमदारांनी म्हटलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. तरी ११२ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही. भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं देवेगौडांच्या जेडीएसला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचं नाव पुढे आलं पण काँग्रेसच्याच काही आमदारांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे वरिष्ठ याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांसोबत बोलताना येडियुरप्पांनी सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितला असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेतली आहे. तर, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला आमंत्रण दिलं आहे. भाजपने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितला आहे. सुत्रांच्या मते, येडियुरप्पा १७ मे रोजी म्हणजेच गुरुवारी शपथ ग्रहण करतील. तर, जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांनीही काँग्रेसच्या समर्थनासह सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
COMMENTS