बंगळुरु – कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा आज कार अपघातात मृत्यू झाला आहे. जामखंडी मतदारसंघाचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा छातीला जबर मार लागल्याने मृत्यू झाला असून ते गोव्याहून बागलकोटकडे निघाले होते. गावाला जात असताना आज सकाळी हा अपघात झाला आहे. तुलासिगेरीमध्ये त्यांच्या इन्होवा गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे.
दरम्यान या अपघातामध्ये त्यांचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. न्यामगौडा हे कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी भाजप उमेदवार श्रीकांत सुबराव कुलकर्णी यांचा 2,795 मतांनी पराभूत केलं होतं. याआधी 1990-91 मध्ये सिद्धू न्यामगौडा हे बगलकोट लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयचा पदभार होता.
COMMENTS