नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगानं करण्यापूर्वीच भाजपच्या आयटी सेलनं केली असल्याचं पहावयास मिळालं आहे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असताना, भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटद्वारे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. यावरून मोठा वाद निर्माण झाला असून यावर आता राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसनं भाजपवर हल्ला चढवला असून भाजप आता ‘सुपर इलेक्शन कमिशन’ झाला आहे अशी जोरदार टीका काँग्रेसनं केली आहे.
दरम्यान निवडणुका कधी घ्यायच्या हे आता भाजपच ठरवत आहे हेच यावरून दिसत असल्याचंही काँग्रेनं म्हटलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कारवाईचा इशाराही दिला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला ‘सुपर इलेक्शन कमिशन’ म्हटलं आहे. निवडणुकांची तारीख आधीच घोषित करून भाजपनं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेलाच आव्हान दिलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
COMMENTS