कर्नाटक निवडणूक रणधुमाळी, उद्योग सम्राटांचे उमेदवारी अर्ज दाखल, कोट्यवधींची मालमत्ता जाहीर !

कर्नाटक निवडणूक रणधुमाळी, उद्योग सम्राटांचे उमेदवारी अर्ज दाखल, कोट्यवधींची मालमत्ता जाहीर !

बंगळुरुकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून भाजप उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री  बी एस येडियुरप्पा, काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि बेल्लारीच्या तीन खान उद्योगसम्राटांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना या उमदवारांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारमध्ये महत्त्वाचं पद सांभाळणारे डी के शिवकुमार यांनी कनकपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी 94 पानी शपथपत्रात 600 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या संपत्तीनुसार त्यांच्या संपत्तीत तब्बल 188 टक्कयांची वाढ झाली आहे. शिवकुमार यांनी 2013 च्या निवडणुकीत 215 कोटी रुपये संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं. तर दुसरीकडे शिवकुमार यांनी आपल्यावर दोन गुन्हे दाखल असल्याची कबुलीही अॅफेडेव्हिटमध्ये दिली आहे. यामध्ये आयकर विभागाला खोटी माहिती दिल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.

दरम्यान कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडियुरप्पा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येडियुरप्पा हे 2008 ते 2011 पर्यंत कर्नाटकातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येडियुरप्पा यांनी आपल्याजवळ 6 कोटी 54 लाख रुपये संपत्ती असल्याचं म्हटलं असून याशिवाय 13 एकर जमीन, दोन कमर्शियल बिल्डिंग, बंगळुरू आणि शिकारीपुरा इथं घरं अशी संपत्ती त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 71 लाख रुपये म्हणजेच 12 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे येडियुरप्पांनी आपल्यावर 14 खटले दाखल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS