कर्नाटकात भाजपची पुन्हा माघार !

कर्नाटकात भाजपची पुन्हा माघार !

बंगळुरु – कर्नाटकमध्ये भाजपनं पुन्हा माघार घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष भाजपला माघार घ्यावी लागली आहे.  त्यामुळे भाजपची रणनिती पुन्हा एकदा अपयशी ठरली असल्याचं दिसत आहे. बहुमत चाचणीआधी खबरदारी म्हणून काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना व्हिप बजावल्यामुळे भाजपला संख्याबळ आपल्याकडे वळविता आले नाही. त्यामुळे अखेर भाजपला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे.

दरम्यान कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे भाजपने अखेरचा डाव खेळला आहे. मात्र, हा डावही भाजपला जिंकता आलेला नाही.  भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी उभा केलेला उमेदवार मागे घेतला. हा डाव टाकून नव्या सरकारला भाजपने कोंडीत पकडण्यासाठी व्युहरचना केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी भाजपनं माघार घेतली असल्याचं दिसून आलं आहे.

COMMENTS