शिवाजी महाराजांबद्दल उपमुख्यमंत्र्याचा अजब दावा

शिवाजी महाराजांबद्दल उपमुख्यमंत्र्याचा अजब दावा

मुंबई : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर सध्या राजकारण चांगलेचे तापले. मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कनार्टकमधील मराठी भाषिक भूभाग केंद्रशासीत करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर कर्नाटकांचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. त्यावर रविवारी दुसरे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीतील असल्याचा दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचे बुधवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित झाला पाहिजे असे म्हटले होते. यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर
देताना “कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे. या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं.”

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असं गोविंद कार्जोळ म्हणाले. ते म्हणाले की, कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते. उध्दव ठाकरे यांनी खुर्चीसाठी वातावरण बिघडवायचे काम करू नये असे गोविंद कार्जोळ म्हणाले.

COMMENTS