बंगळुरू – काँग्रेसनं कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपली 218 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. इतर 6 ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या 6 जागांपैकी पाच ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार आहे. तर एका जागेवर काँग्रेस स्वराज इंडिया पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर स्वराज इंडिया या पक्षाची स्थापना केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पुन्हा एकदा चामंडेश्वरी या आपल्या पारंपारिक मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघातून ते 5 वेळा निवडूण आले आहेत. तर दोन वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात त्यांना पराभूत करण्यासाठी धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजपनं कंबर कसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बागलकोट जिल्ह्यातील बदामी या सुरक्षीत मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांचे समर्थक आणि काँग्रेस हायकमांडं केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला हायकमांडने नकार दिला. त्यामुळे चामंडेश्वरी या मतदारसंघातून त्यानी लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सिद्धरामय्या यांचा मुलाला वरुना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. सिद्धरामय्या मंत्रीमंडळातील 3 मंत्र्यांच्या मुलांनाही तिकीट देण्यात आलं आहे. तर एच सी महादेवप्पा यांच्या मुलाला मात्र तिकीट नाकारण्यात आलं आहे. महादेवाप्पा हे दलित नेते असल्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आल्याचा आरोप सदानंद गौडा यांनी केला आहे. या तिकीट वाटपात 15 महिलांना तिकीट देण्यात आलं आहे. तर 15 मुस्लिमांनाही तिकीट देण्यात आलं आहे. दोन ख्रिश्चिन उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. काँग्रेसनं 102 विद्यमान आमदारांना तिकीट दिली आहेत. तर 10 आमदारांची तिकीटे कापण्यात आली आहेत.
COMMENTS