बंगळुरू – काँग्रेसनं दक्षिण बंगळुरूमधील जयानगर विधानसभेची जागा जिंकली आहे. पक्षच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी भाजपचे उमेदवार बी. एन प्रल्हाद यांचा केवळ 3 हजार मतांनी पराभव केला. या विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या एकने वाढली आहे. ही जागा यापूर्वी भाजपकडे होती. ती काँग्रेसनं खेचून आणली आहे. त्यामुळे सत्तेवर आरुढ झालेल्या काँग्रेसला आणि जेडीएसला मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्नाटकमध्ये गेल्या महिन्यात मतदान झालं होतं. मात्र या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार बी. एन. विजयकुमार यांचं निधन झाल्यामुळे या मतदारसंघातील मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. ते 11 जुन रोजी झालं. भाजपनं विजय कुमार यांचे भाऊ बी. एन. प्रल्हाद यांना रिंगणात उतरवलं होतं. तर काँग्रेसनं काँग्रेसचे हेवीवेट नेते रामलिंग रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डी यांना रिंगणात उतरवलं होतं. कर्नाटकात काँग्रेस जेडीएस एकत्र आल्यानंतरचा भाजपला पहिला दणका बसला आहे.
या मतदारसंघात जेडीएसनंही उमेदवार उभा केला होती. मात्र मतदानाच्या ऐन दोन दिवस त्यांच्या उमेवाराने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कसाबसा 3 हजार मतांनी विजयी झाली. ही जागा भाजपकडे होती. भाजपनं दिवंगत आमदाराच्या भावाला तिकीट देऊनही काँग्रेस जेडीएस एकत्र आल्यामुळे भाजपला जागा राखता आली नाही. या विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जेडीएस आणि काँग्रेस एकत्र येण्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो.
COMMENTS