चेन्नई – माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिंदम्बरम यांना सीबीआयने अटक केली आहे. कार्ती चिदंबरम हे लंडनहून परतत असताना त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. आयएनएक्स मीडिया मनी लाँण्डरिंग प्रकरणी सुरु असलेल्या तपासात कार्ती चिदंबरम सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे. त्यामुळे कार्ती चिदम्बरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
#FLASH Karti Chidambaram taken into custody by CBI at Chennai Airport over INX media case. pic.twitter.com/91WjX5fQ80
— ANI (@ANI) February 28, 2018
दरम्यान पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप कार्ती चिदम्बरम यांच्यावर आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते.
COMMENTS