कसाबची फाशी रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले – भाजप

कसाबची फाशी रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले – भाजप

मुंबई – मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची फाशी रोखण्यासाठी काँग्रेसच्या काही खासदार आणि मंत्र्यांनी प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे प्रवक्ते अवदूत वाघ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील माझा विषेश या कार्यक्रमात केला आहे. कसाबला फाशी देण्याऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी काँग्रेसच्या काही खासदार आणि आमदारांची मागणी होती असा आरोप त्यांनी केला आहे.

यामध्ये त्यांनी कोणतंही नाव मात्र घेतलं नाही. कार्यक्रमात वारंवरा अवदूत वाघ यांना त्या काँग्रेस खासदार आणि मंत्र्यांची नावे सांगण्याचा आग्रह सर्वच जणांनी केला. मात्र त्याचं उत्तर अवधूत वाघ यांनी  कार्यक्रम संपेपर्यंत दिलं नाही. वास्तविक काँग्रेसच्या कार्यकाळातच अजमल कसाबला फाशी देण्यात आली होती. आता अवदूत वाघ यांच्या आरोपवर काँग्रेस काय उत्तर देणार ते पहावं लागेल.

COMMENTS