कल्याण-डोंबिवली – महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेवकावर हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे बाहुबली नगरसेवक महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकूण ११ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक असलेल्या आरोपींनी कुणाल पाटील यांना मारण्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तसेच या हत्येच्या सुपारीसाठी ११ लाख रुपये अॅडव्हान्सही घेण्यात आलं असल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे. वसई तालुक्यातील गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भादवी कलम 120 ब , 302 सह 115 व आर्म्स ऍक्ट 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून त्यामुळे आता भाजपचा नगरसेवक महेश पाटील अडचणीत सापडला आहे.
COMMENTS