कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नगरसेविका आशालता बाबर आणि नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्यात वाद झाला आहे.या दोन्ही नगरसेविकांमध्ये पाण्याच्या मुद्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे. शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयासमोर हा वाद झाला होता. त्यामुळे नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्याविरोधात नगरसेविका आशालता बाबर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या तक्रारीची नोंद झाली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान एका सोसायटीच्या पाणी कनेक्शनवरुन दोन्ही नगरसेविकांमध्ये खडाजंगी झाली. बाचाबाचीनंतर प्रेमा म्हात्रे यांनी आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. मात्र मारहाण केली नसल्याचा दावा नगरसेविका म्हात्रे यांनी केला.आशालता बाबर या नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. रवीकिरण सोसायटीच्या पाणीप्रश्नावरुन बाबर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला. या सोसायटीला पाणी दिल्यास आपल्या प्रभागात परिणाम होईल म्हणून बाबर आणि म्हात्रे आमने सामने आल्या आहत.
COMMENTS