नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी आज राजीनामा दिला. याबाबत ट्वीट करुन त्यांनी आपमधून राजीनामा दिला असल्याचं जाहीर केलं. परंतु पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आशुतोष यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे. या जन्मी तरी तुमचा राजीनामा स्वीकारणं शक्य नसल्याचं केजरीवाल यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे आशूतोष यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचं दिसत आहे.
How can we ever accept ur resignation?
ना, इस जनम में तो नहीं। https://t.co/r7Y3tTcIOZ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 15, 2018
दरम्यान राज्यसभेच्या उमेदवारीवरुन आशुतोष हे पक्षावर नाराज झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात फारसे सक्रीय देखील नव्हते. याआधीही त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारण्यात आला नव्हता अशी माहिती आहे. परंतु आज पुन्हा आशुतोष यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीनामा दिल्याचे जाहीर केले. मात्र त्याला ट्विटरद्वारेच उत्तर देत आशुतोष यांचा राजीनामा या जन्मात तरी स्वीकारणं शक्य नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आशुतोष यांची नाराजी दूर करण्यात केजरीवालांना यश येणार का हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS