केरळ – केरळमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरु असून महापुरामुळे आजच्या दिवशी 33 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असून आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशभरातून केरळला मदतीचा हात दिला जात असून केंद्र सरकारनं 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. या महापुरात अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही तातडीची बैठक घेऊन 20 कोटी मदत जाहीर केली आहे.
#KeralaFloods: Kerala CM Pinarayi Vijayan says "total 33 people have died in the state today". Death toll rises to 357. pic.twitter.com/aiACV26mcv
— ANI (@ANI) August 18, 2018
दरम्यान केरळमध्ये आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर राज्य सरकारने 11 जिल्ह्यांना एक दिवसाचा अतिदक्षतेचा इशारा दिला असून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वच राज्यांकडून मदतीचा ओख सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदतीचे आवाहन केले आहे.
COMMENTS