केरळमधील पूरस्थिती गंभीर असून अनेक शहरे, गावं जलमय झाली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काल रात्रीपर्यंत या पावसाने 324 जणांना बळी घेतला आहे. काही शहरांमध्ये तर प्रंचड प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चक्क समुद्रातील बोटी वापरण्यात येत आहेत. हेलिकॉप्टर आणि कोस्ट गार्डच्या मदतीने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असून पूरस्थिती अधीकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
विविध राज्यातून केरळला मदतीचा हात दिला जात आहे. दिल्ली सरकारने केरळला 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तामिळनाडू, कर्नाटक सरकारनेही मदत जाहीर केली आहे. अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी केरळला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तर जॉन अब्राहमनं मोठ्याप्रमाणात आर्थिक मदत केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळ न दडवता याला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली आहे.
Dear PM,
Please declare #Kerala floods a National Disaster without any delay. The lives, livelihood and future of millions of our people is at stake.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 18, 2018
दरम्यान केंद्र सरकारतर्फेही केरळला मदतीचा हात दिला जात आहे. काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये पोहचले आहेत. ते आज पूरस्थितीचा आढावा घेत आहेत.
पावसामुळे मृत पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे.
COMMENTS