महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये खडसे महाजन वाद पेटला !

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये खडसे महाजन वाद पेटला !

जळगाव – जळगाव महापालिकेची निवडणुक अपेक्षेपेक्षा एक महिना आधिच जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यावरुन आता खलबंत सुरू आहेत. मात्र याच मुद्यावरुन भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी महापालिका निवडणुकीत सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीसोबत युती करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. तर एकनाथ खडसे हे स्वबळावर निवडणूक लढण्याच्या मताचे आहेत.

मी गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे असा उपहासात्मक टोला काल एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजन यांना लगावला. तर खडसे आमचे नेते आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे करु आणि त्यांना विश्वासात घेऊनच सर्व सुरू असल्याचं वक्तव्य गिरीष महाजन यांनी केलं आहे. मात्र सुरेश जैन यांच्या खान्देश आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक केली. त्या बैठकीला एकनाथ खडसे किंवा त्यांचे समर्थक आणि जळगावचे आमदार सुऱेश भोळे हेही गैरहजर होते.

भाजप देशात, राज्यात सत्तेवर आहे. सुरेश जैन यांच्यावर जळगावची जनता नाराज आहे. त्यामुळे स्वबळावर लढून जिंकणयाची भाजपला संधी आहे. असं एकनाथ खसडे यांचं मत आहे. तर खान्देश विकास आघाडीसोबत गेल्यास एकहाती सत्ता मिळेल आणि सुरेश जैन यांनाही भाजपसोबत घेता येईल अशी महाजन यांची रणनिती असल्याचं बोललं जातंय. खडसेंना पर्याय म्हणून जैन यांच्यासारखा तगडा माणूस पुढील काळात भाजपसोबत येत असेल तर त्याचा फायदा होईल असा मुख्यमंत्री आणि जैन यांचा प्रय़त्न असल्याचंही बोललं जातंय.

जळगाव महापालिकेत एकूण 75 जागा आहेत. खान्देश विकास आघाडीचे 33 विद्यमान नगरसेवक आहेत. त्याचबरोबर मनसेचे 12 विद्यमान नगरसेवक खान्देश विकास आघाडीत सामिल झाले आहेत. त्यामुळे खान्देश विकास आघाडीत विद्यमान नगरसेवकांची संख्या 45 होत आहे. त्यांना तिकीट द्यावचं लागणार आहे. त्यामुळे 30 जागा उतरतात त्यामध्ये मनसे आणि खान्देश विकास आघाडीचे काही इच्छुक असतील. त्यांना तिकीटे दिल्यास भाजपला किती जागा राहतात असाही प्रश्न आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये खान्देश विकास आघाडीसोबत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रास यांनी एकत्र सत्ता भोगली आहे. तर गेली 5 वर्ष भाजप विरोधी पक्षात होता. अस असाताना खान्देश विकास आघाडीसोबत जायचंच कशाला ? तिथे जाऊन भाजला जागा किती मिळणार ?  खान्देश विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवायची का असे प्रश्न खडसे यांच्या समर्थकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने महाजन यांच्याप्रमाणे निर्णय होतो की बालेकिल्ल्यात खडसे यांच्या मताप्रमाणे निर्णय होतो ते पहावं लागेल.

COMMENTS