नवी दिल्ली – शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी. व्ही. नलावडे यांनी अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी खोतकर यांनी उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरल्याचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांविरोधात याचिका दाखल केली होती.यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं खोतकरांची आमदारकी रद्द केली होती.
त्यानंतर अर्जुन खोतकारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS