ब्रेकिंग न्यूज – अर्जुन खोतकर यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत !

ब्रेकिंग न्यूज – अर्जुन खोतकर यांना सुप्रिम कोर्टाचा दिलासा, आमदारकी शाबूत !

दिल्ली – शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सुप्रिम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. 24 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं खोतकर यांची आमदारकी रद्द केली होती.

हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात खोतकर यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. तिथे त्यांना दिलासा मिळाला आहे. काल झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत खोतकर यांना मतदानही करता आलं नव्हतं. आता त्यांची आमदारकी, मंत्रीपद आणि मतदानाचा हक्क शाबूत राहणार आहे. पुढची सुनावणी येईपर्यंत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू शकतात. त्यामुळे खोतकर आणि शिवसेनेलाही या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS